कार चालकास मारहाण करून कार पळविणारे आरोपी अटकेत
अहमदनगर | Ahmednagar News: पुणे येथील सचिन बालाजी लेंडवे हा मंगळवारी पुणे येथून प्रवासी घेऊन येत नगर येथे आला होता. नगर येथे प्रवासी सोडून रात्री तो कायनेटिक चौकात रस्त्याच्या कडेला कार थांबवून विश्रांती करत असताना यावेळी तीन चोरट्यांनी त्याला येथे कार का लावली अशी विचारणा करत मारहाण केली. तसेच त्याच्याकडील चार हजार रुपये हिसकावून घेत त्याची कार पळवून नेली. याबाबत सचिन लेंडवे याने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी तत्काळ पोलिसांनी आरोपीचा शोध घेत केडगाव परिसरातून अटक केली. गौरव राजेंद्र शेवाळे, शरद चंदू पवार, व राहुल रामचंद्र बोरुडे रा. केडगाव अशी अटक केलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्यातील निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
Web Title: Ahmednagar News Accused of beating car driver arrested