Home अहिल्यानगर Ahmednagar News: दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी केले गजाआड

Ahmednagar News: दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी केले गजाआड

Ahmednagar news accused in the robbery case were arrested 

Ahmednagar News: सहा वर्षापासून पसार असणाऱ्या आरोपींना तसेच वांबोरी घाटात वाहन चालकांना अडवून लुटमार करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. सुरेश रणजीत निकम, सतीश अरुण बर्डे, सागर शिवाजी जाधव यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २३ एप्रिल रोजी गोरक्षनाथ गडाच्या चढावर वांबोरी फाटा मार्गे जात असताना चार अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येऊन रितिक छजलानी व त्याच्या मित्राजवळील तीन मोबाईल व सोने चांदीचे दागिने असा एकूण १ कोटी १६ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रितिक प्रेमचंद छजलानी वय २० रा, भिंगार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वीच आरोपी विकास हनवत,करण शेलार, व एक अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेय्न एमआयडी सी पोलीस स्टेशनला हजर केले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश निकम हा फरार झाला होता. आरोपी सुरेश निकम हा कात्रड येथे घरी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सुरेश रणजीत निकम यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा सतीश बर्डे व सागर जाधव यांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. त्यावरून या दोघांचा पोलीस पथकाने शोध घेऊन ताब्यात घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.   

Web Title: Ahmednagar news accused in the robbery case were arrested 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here