Home अहमदनगर अहमदनगर खुनाचा उलगडा! अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी …..

अहमदनगर खुनाचा उलगडा! अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी …..

Breaking News | Ahmednagar Murder Case: एमआयडीसीतील खुनाचा एलसीबीकडून उलगडा; दोघे अटकेत.

Ahmednagar murder revealed, To commit an unnatural act

अहमदनगर: अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी सुरूवातीला दारू पाजली, मात्र विरोध केल्याने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळा आवळून व डोक्यात दगड घालून संदीप कमलाकर शेळके उर्फ बाळू (रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) याचा खून केल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून दोघांना आग्रा, उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली आहे.

विशाल चिंतामण जगताप (वय २२ रा. चेतना कॉलनी, दांगट मळा, एमआयडीसी) व साहील शेरखान पठाण (वय २० रा. लेडॉळी मळा, नागापूर, एमआयडीसी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. संदीप शेळके बुधवारी (दि. २१) दुपारी साडेबारापासून घरी आले नव्हते. दरम्यान शुक्रवारी सकाळी एमआयडीसीतील सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीत त्यांचा मृतदेह आढळून आला. नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळा आवळून व दगडाने डोके, चेहऱ्याचा चेंदामेंदा करून त्यांना ठार मारण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, भिमराज खर्से, फुरकान शेख, देवेंद्र शेलार, बिजय ठोंबरे, सागर ससाणे, आकाश काळे, प्रशांत राठोड व अर्जुन बडे यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने घटना ठिकाणी आजुबाजूस राहणाऱ्या लोकांकडे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना मयत संदीप शेळके हे बुधवारी (दि. २१) विशाल जगताप व साहील पठाण यांच्यासोबत देशी दारूच्या दुकानात दारू पित बसलेले असल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व त्यांच्या पथकाने विशाल जगताप व साहील पठाण यांचा राहत्या घरी व आजुबाजूस शोध घेतला असता ते ते दोन दिवसांपासून घरी नसल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास केला असता ते दोघे शहागंज मोहल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश येथे असल्याचे समोर आले. पथकाने सदर ठिकाणी जावून त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याचे अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले. संदीप सोबत अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी त्याला जास्त दारू पाजून एमआयडीसीतील बद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीत नेले, मात्र त्याने विरोध करताच जिवे ठार मारले असल्याची कबुली त्यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Ahmednagar murder revealed, To commit an unnatural act

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here