Home अहिल्यानगर Ahmednagar: कुलदैवताची पेटी मागितल्याने तरुणाचा खून

Ahmednagar: कुलदैवताची पेटी मागितल्याने तरुणाचा खून

Ahmednagar Murder of a young man for asking for a coffin

अहमदनगर | Ahmednagar: केडगाव परिसरातील सोनेवाडी फाटा येथे दोन सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता घरातून नेलेली कुलदैवताची पेटी परत मागितल्याने ८ जणांनी दगड व विटाने मारहाण करत तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा १३ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आहे.

विकी ढोल्या चव्हाण असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. नारायण चव्हाण हा विकी चव्हाण यांच्या घरातील कुलदैवताची पेटी घेऊन आला होता. विकी याने पेटी परत मागितली असता याच्या रागातून सोनेवाडी फाटा येथे विकी याला २ सप्टेंबर रोजी जबर मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. १३ सप्टेंबर रोजी विकी याचा मृत्यू झाला.

दरम्यान मयताची बहिण ताई सुरेश काळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून नारायण झेंड्या चव्हाण, रुपेश नारायण चव्हाण, राहुल छोट्या काळे, विपुल छोट्या काळे, शसराम धोंड्या काळे सर्व रा. केडगाव, छोट्या काळे, बिनाका तुका चव्हाण, बापकार्या इलाक काळे रा. भोसले आखाडा यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar Murder of a young man for asking for a coffin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here