Home अहिल्यानगर महावितरणच्या अभियंत्याला धमकी देत मागितली दोन लाखांची खंडणी

महावितरणच्या अभियंत्याला धमकी देत मागितली दोन लाखांची खंडणी

Ahmednagar MSEDCL engineers threatened, two lakh ransom demanded

अहमदनगर | Ahmednagar Crime:  महावितरणचे उप कार्यकारी अभियंता यांना दोन लाख रूपयांची खंडणी (Ransom ) मागितल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एकाविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्ष शिवाजी शेटे (रा. शनिशिंगणापूर ता. नेवासा) असे गुन्हा (Crime) दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत उप कार्यकारी अभियंता किसन भीमराव कोपनर (वय 42 रा. शिलाविहार रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

उप कार्यकारी अभियंता कोपनर यांच्याकडे अहमदनगर शहर क्षेत्र वगळता संपुर्ण नगर तालुका कार्यक्षेत्राची जबाबदारी आहे. तसेच वेगवेगळ्या सेक्शनचे अभियंता व कर्मचारी यांचे पथक बनवून वीजचोरी बाबत कार्यक्षेत्रात तपासी करण्याचे काम कोपनर यांच्याकडे आहे.

6 ऑगस्ट, 2018 रोजी कोपनर यांच्या पथकाने जेऊर सेक्शन मधील खोसपुरी शिवारातील गोरक्ष शिवाजी शेटे यांचे मालकिचे लेमन ट्री हॉटेल येथे विज चोरी बाबत तपासणी केली असता ते विज चोरी करताना मिळुन आले होते. त्यांचेवर दंडात्मक कारवाई केली होती.

त्यांनी 27 हजार 370 रूपये रोख स्वरूपात दंड भरला होता. त्यानंतर 3 जानेवारी, 2022 रोजी एक वायरमन व एका कंत्राटी कर्मचार्‍यावर लाचलुचपतची कारवाई झाली होती. यात त्या कर्मचार्‍यांचे निलंबन झाले होते. या कारवाई नंतर त्याचा फायदा घेत गोरक्ष शेटे याने 29 जानेवारी, 2022 पासून कोपनर यांना वेळोवेळी फोन करून,‘दोन लाख रूपये द्यावेच लागतील नाही तर मी तुमच्या विरूध्द विनयभंग तसेच इतरांमार्फत अ‍ॅट्रोसिटी तसेच वेगवेगळे गुन्हे दाखल करीन’, अशी धमकी दिली.

त्यानंतर शेटे याने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने कोपनर 7 मे, 2022 रोजी सदर अर्जाची चौकशी कामी कोतवाली पोलीस ठाण्यात आले होते. चौकशी झाल्यानंतर पोलीस ठाण्यातून घरी जात असताना दुपारी पोलीस ठाण्याच्या बाहेर आल्यावर गोरक्ष शेटे हा माझ्या जवळ आला व तुम्ही मला दोन लाख रूपये द्या, नाहीतर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करीन अशी धमकी देवुन माझ्या जवळ दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली असल्याचे कोपनर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title; Ahmednagar MSEDCL engineers threatened, two lakh ransom demanded

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here