अहमदनगर: मॉर्निंग वॉक जिवावर बेतला; महिलेचा मृत्यू
Ahmednagar | अहमदनगर: रस्त्याने फिरण्यास गेलेल्या महिलेस अज्ञात वाहन चालकाने धडक दिल्याने महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. बुऱ्हाणनगर- वारुळवाडी ता.नगर रस्त्यावर मंगळवारी (ता. 25) सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अपघाताचा (Accident) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गयाबाई वसंत वाघ (वय 54, रा. गुगळे कॉलनी, बुऱ्हाणनगर) असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या वारुळवाडी रस्त्यावर सोपान कर्डिले यांच्या घरासमोर सकाळी फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला. त्यांची मुलगी रोहिणी वसंत वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक साठे अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Ahmednagar Morning Walk Accident; Death of a woman