Home अहमदनगर अल्पवयीन मुलीवर अत्याचार, फरार आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, फरार आरोपी अटकेत

Ahmednagar Minor girl abuse

अहमदनगर: अवघ्या सहा वर्षाच्या मुलीवर अज्ञात स्थळी नेऊन अत्याचार करून पसार असलेल्या संशियीत आरोपीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

भाऊसाहेब बाळू माळी रा. चिचोडी पाटील ता. नगर या संशियीत आरोपीस बुधवारी करमाळा येथून अटक केली आहे.   

याबाबत माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील एका गावात आरोपीने सदर अल्पवयीन मुलीस निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. माळी आरोपी हा करमाळा तालुक्यातील दिवेगाव्हान परिसरात लपला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली. त्यानुसार तपास करीत आरोपीस अटक केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Ahmednagar Minor girl abuse

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here