प्रेमप्रकरण ड्रामा: आई म्हणते तरुणाने डांबून ठेवले, मुलगी म्हणते मर्जीनेच गेले
अहमदनगर | Ahmednagar: लग्नासाठी माझ्या मुलीस एका तरुणाने बळजबरीने डांबून ठेवले असल्याची तक्रार महिलने केल्यावर तिच्या समोर मुलीला हजर केले असता मुलीने सर्वांसमोर माझे त्याच्यावर प्रेम आहे. मी माझ्या मर्जीनेच त्याच्यासोबत आले असा जबाब दिल्याने महिला आईस धक्काच बसला. त्याना रुग्णालयात दाखल करावे लागले. रविवारी रात्री उशिरापर्यंत हे प्रकरणाचा ड्रामा सुरु होता.
यबाबत माहिती अशी की, एका शिक्षिका महिलने रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत तिने आपल्या २५ वर्षीय मुलीला एका मुलाने पळवून नेऊन जबरदस्तीने लग्न करण्यासाठी डांबून ठेवले असल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसानी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तत्काळ शोध सुरु केला असता त्या तरुण व तरुणीचा शोध घेऊन लालटाकी परिसरातून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसासमोर मुलीने जबाब दिला की, मला कुणी पळवून आणले नाही तर मर्जीनेच गेले असल्याचा जबाब दिला.
सदर मुलीचा जबाब घेतल्यानंतर मुलीस पोलिसांनी स्नेहालयात दाखल केले. तिच्यासोबत असलेया तरुणावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. तरुण हा नगर येथील रहिवासी असून पुणे येथे दोघे सोबत काम करत होते.
Web Title: Ahmednagar Love drama