Home अहमदनगर विखे फॅक्टरचा फुगा फुटला, फोडाफोडीच्या राजकारणाला नाकारले

विखे फॅक्टरचा फुगा फुटला, फोडाफोडीच्या राजकारणाला नाकारले

Breaking News | Ahmednagar Lok sabha Election: जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणुकीत मताधिक्याने निवडून आले.

Ahmednagar Lok sabha Election bubble of the Vikhe factor burst

अहमदनगर : जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणुकीत मताधिक्याने निवडून आले. या निवडणुकीतून जनशक्तीचा विजय झाला असून, विखे फॅक्टरचा फुगा फुटल्याची भावना कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. अँड सुभाष लांडे यांनी व्यक्त केली.

कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीला राज्यभर सक्रिय पाठिंबा दिला होता. कम्युनिस्ट पक्षाने निवडणुकीपूर्वी भाजप हटाव, देश बचाव ही जनजागरण मोहीम राबवली होती. जिल्ह्यातही पदयात्रा व गावोगावी सभा घेऊन भाजपच्या जनविरोधी, लोकशाही विरोधी धोरणाचा पर्दाफाश केला होता. राज्यातील सरकारच्या केवळ घोषणाबाजीला आणि फोडाफोडीच्या राजकारणाला नाकारले असून, मतपेटीतून महायुती विरुद्ध कौल दिला असल्याचे कॉ. अॅड. लांडे यांनी म्हटले आहे.

शेतकरी, कामगार गृहिणी यांना महागाई व बेकारीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. या सरकारच्या काळात मोठ्या उद्योगपतींना व ठेकेदारांना सवलती व सामान्य जनता आणि विरोधकांना प्रचंड त्रास झाला आहे. यामुळे राज्यात व जिल्ह्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धनशक्ती, हुकूमशाही व दहशतीच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही, हे गावोगावच्या सामान्य कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अॅड. बन्सी सातपुते, सहसचिव कॉ. अॅड सुधीर टोकेकर, कॉ. संतोष खोडदे व कॉ. संजय नांगरे यांनी मतदारांचे आभार मानले.

Web Title: Ahmednagar Lok sabha Election bubble of the Vikhe factor burst

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here