कर्तव्यनिष्ठा: भाजी विक्रेत्या आईवरच स्वतःच्या मुलाने केली कारवाई
पाथर्डी | Ahmednagar Lockdown: कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून कठोर अंमलबजावणी केली जात आहे. पाथर्डी येथे नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्याने स्वतः च्या भाजी विक्रेत्या आईवर कारवाई केली आहे.
हातावर पोट असलेली भाजी विक्रेती आई व नगरपरिषदेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या मुलाच्या बाबतीत घटना घडली आहे. रस्त्यावर बसून भाजी विकत असलेल्या आपल्या आईचा भाजीपाला मुलानेच जप्त करून नेण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरु आहे. भाजीपाला दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. एका जागी बसून भाजी विकण्यास मनाई आहे. तसेच पाथर्डी शहारत गर्दी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदेचे पथक भाजी विक्रेते बसतात तेथे आले. या पथकात रशीद शेख यांचाही समावेश आहे. आई बेगम शेख ही भाजी विक्रेत्या आहेत. त्या रस्त्यावर भाजी विकत होता. रशीद शेख याने कोणताही विचार न करता आईच्या भाजीपाला टोपल्या उचलून कचरा गाडीत टाकल्या. आईलाही कर्तव्य कठोर मुलाकडे पाहत राहिल्यावाचून पर्याय नव्हता.
तहसीदार व पालिका अधिकाऱ्यांनी शेख यांनी भेदभाव न करता केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे. नियम हे सर्वांसाठी असतात अशी प्रतिक्रिया शेख यांनी व्यक्त केली.
Web Title: Ahmednagar Lockdown Update