अहमदनगर जिल्हा लॉकडाऊन संदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे विधान
अहमदनगर(Ahmednagar): अहमदनगर जिल्ह्यात करोना रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिनांक २४ रोजी नगर दौऱ्यावर आले होते.
नगर जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी तसेच नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
जिल्ह्यात सध्या लॉकडाऊनची गरज नसल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सध्या रुग्णाची संख्या वाढत आहे. तरी बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. तालुका स्तरावर बेडची व्यवस्था वाढवली आहे. सध्या तरी संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नाही असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊन होणार नाही असे मुश्रीफ म्हणाले आहेत.
सध्याचे सण,उत्सव घरातूनच साजरे करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावे, नियमांचे पालन करावे आपण नक्कीच करोनावर मात करू असे मत त्यांनी व्यक्त केले.
या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, खा. सुजय विखे, आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आदी उपस्थित होते.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Ahmednagar lockdown Hasan Mushrif Statement