लाचखोर मनपा लेखाधिकारीच्या घरात सापडलं इतक्या लाखांचे घबाड
अहमदनगर | Ahmednagar: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अटकेत असणारा मनपाचा मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर याच्या घरात साडे अकरा लाख रुपयांची रोकड, तब्बल ५४० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, दीड किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू आढळून आल्या आहेत. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीला मानकर यांच्या पत्नीने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
एका ठेकेदाराला धनादेश देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ताब्यात घेतले. एक पथक घराची झाडझडती करण्यासाठी रवाना करण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.
Web Title: Ahmednagar Lakhs of rupees were found in the house of a corrupt Municipal Accountant