पतीनेच केले महिलेचे अश्लील फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल
अहमदनगर | Ahmednagar: स्वतःच्या पत्नीचे अश्लील फोटो व्हाटसअप ग्रुप वर व्हायरल करून तिला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी महिलेचा पती असल्याचे उघडकीस आले आहे.
अकोले तालुक्यातील निळवंडे येथील रहिवासी तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सदर २२ वर्षीय तरुणाचे ३ वर्षापूर्वी लग्न झाले होते. मागील एक वर्षापासून पत्नी त्याच्याजवळ राहत नसल्याने रागातून पत्नीचा बदला घेण्यासाठी आरोपीने दुसऱ्याच्या नावे सिमकार्ड घेऊन त्यावर व्हाटसअप वर ‘माझ पिल्लू माझ्यावर रूसल’ असा ग्रुप तयार करून पत्नीला त्या ग्रुपमध्ये पत्नीच्या नंबरचा समावेश केला. त्या ग्रुपवर पत्नीचा चेहरा व खाली फोटो एडीट करून नग्न अवस्थेतील फोटो तयार करून फिर्यादी महिलेला पाठविला.
तसेच हे फोटो फेसबुक वर शेअर करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी १७ सप्टेंबर रोजी सायबर पोलिसांत फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतिक कोळी व त्यांच्या पथकाने तपास करून आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने वापरलेला मोबाईल व सीम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपीचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले आहे. त्याने इंटरनेटचा वापर करत चुकीचा वापर करून गुन्हा केला आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar Husband made an obscene photo of a woman to share