Home अहमदनगर पत्नीचे अनैतिक संबध पतीने केली आत्महत्या

पत्नीचे अनैतिक संबध पतीने केली आत्महत्या

Ahmednagar Husband commits suicide 

अहमदनगर | Suicide: वारंवार समजूत देवूनही पत्नीने तिचे पर पुरुषासोबत असलेले अनैतिक संबंध बंद केले नाहीत. याउलट प्रियकराच्या मदतीने तिने पतीलाच संबधाच्या आड आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

अखेर हतबल झालेल्या पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आष्टी तालुक्यात घडली. याप्रकरणी पत्नी आणि प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मयत तरुणाच्या भावाने आष्टी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याबाबत माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील वाहनचालकाच्या पत्नीचे पत्नीचे भावकीतील तरूणासोबत अनैतिक संबध आहेत. याबाबत पतीने त्याच्या भावाला सांगून पत्नीची समजूत घालण्यास सांगितले. त्यामुळे शनिवारी भावाने पत्नीसह पुण्याहून येत भावाजायीला व तिच्या प्रियकराला बोलावून घेतले. आणि त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या पतीनेही पत्नीच्या प्रियकराला तिला फोन करू नको किंवा तिला भेटू नकोस असे सांगितले मात्र त्या दोघांनीही त्यास नकार दिला. उलट तूच आमच्या प्रेमाच्या आड आलास तर तुला जिवंत सोडणार नाही. अशी पतीला धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर प्रियकरापाठोपाठ पत्नीही घरातून बाहेर निघून गेली. अखेर पतीने बुधवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar Husband commits suicide 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here