Home अहमदनगर नगरमध्ये आणखी एक हनीट्रॅप: बागायतदाराला महिलेने जाळ्यात अडकविले

नगरमध्ये आणखी एक हनीट्रॅप: बागायतदाराला महिलेने जाळ्यात अडकविले

Ahmednagar Honey Trap Case Pathrdi another one

अहमदनगर | Honey Trap: नगरमधील आणखी एका टोळीने पाथर्डी तालुक्यातील बागायतदाराला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविल्याची घटना समोर आली आहे. वडगाव गुप्ता परिसरात राहणार्‍या तरूणीने त्या बागायतदाराशी मैत्री करून त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोद्वारे त्याला ब्लॅकमेल करून दोन लाखांची खंडणी मागितली.

दिनांक १५ व  १६ जून रोजी ही घटना घडली. वडगाव गुप्ता परिसरात राहत असणाऱ्या तरुणीने त्या बागायतदारशी मैत्री करून तिच्यासोबत फोटो काढले या फोटोच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करून दोन लाखांची खंडणी मागितली. या बागायतदाराने त्या टोळीला चेकने पैसे दिले. आणि  नंतर एमआयडी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसानी त्या टोळीविरोधात खंडणी, चोरी आदी गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्हा दाखल झालेल्या वडगाव गुप्ता येथील तरूणी, तिचा पती व त्यांचा पाथर्डी तालुक्यातील एकाचा समावेश आहे. ते सध्या फरार झाले असून एमआयडीसी पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तरूणीने त्या बागायतदाराला फोन करून त्याच्याशी मैत्री केली. या मैत्रीतून तीने त्या बागायतदाराला वडगाव गुप्ता येथील घरी बोलावून घेतले. तेथे त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे तरूणीने त्या बागायतदाराला ब्लॅकमेल करण्याचे ठरविले. १५ जून रोजी सायंकाळी बागायतदाराला घरी बोलून घेतले. ते दोघे एकत्र असताना त्याठिकाणी तरूणीचा पती आला. त्याने त्यांना एकत्र पाहिले असे भासवून बागायतदाराला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बागायतदाराकडील पाच हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. दुसर्‍या दिवशी पाथर्डी तालुक्यातील पंटरला मध्यस्थी घालून दोन लाख रूपयांचे तीन चेक घेतले. आपली फसवणूक झाली असल्याचे त्या बागायतदाराच्या लक्षात येताच त्याने झालेला सर्व प्रकार एमआयडीसी पोलिसांसमोर सांगितला. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे.

Web Title: Ahmednagar Honey Trap Case Pathrdi another one

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here