अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यांत ढगफुटीसदृष्य पाऊस, भयपटासारखी परिस्थिती निर्माण
Ahmednagar heavy Rain: कोपरगाव तालुक्यासह शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र दळवळण विस्कळीत, राहुरी तालुक्यातील पच्छिमेकडील पठार भागात आज पहाटेच्या सुमारास ढगफुटीसदृष्य पाऊस.
अहमदनगर: राहुरी तालुक्यातील पच्छिमेकडील पठार भागात आज पहाटेच्या सुमारास ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. संपुर्ण राहुरी तालुक्यात बुधवारी मध्यरात्री पासुन विजांच्या कडकडांसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. विजांचा पडणारा लख्ख प्रकाश व ढगांचा गडगडाटामुळे एखाद्या भयपटासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान राहुरी तालुक्यातील पच्छिमेकडील वरशिंदे, वाबळेवाडी, कोळेवाडी, म्हैसगाव व ताहाराबाद परिसरात ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने त्या परिसरातील लहान-मोठे बंधारे फुटल्याने कोळेवाडीला पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने काही कुटुंबाने सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. यापुराच्या पाण्यात काही रहिवाशांच्या जवळपास दिडशे ते दोनशे कोंबड्या वाहून गेल्या आहे. पुराच्या पाण्याने शेतमालाचे प्रंचड नुकसान झाले असून परिसरातील काही लहान पुलं वाहून गेल्याने अनेक वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. मंडलाधिकारी व तलाठ्यांनी येऊन परिस्थितीची पाहणी केली असल्याची माहिती कोळेवाडीचे सरपंच डॉ.जालिंदर घिगे यांनी सांगीतले.
या ढगफुटीसदृष्य पावसामुळे मुळाधरणात पाण्याची आवक वाढल्याने नदीपात्रात सकाळी 10 हजार क्युसेस तसेच दुपारी 3 वाजता 15 हजार क्युसेसचा विसर्ग वाढविण्यात आला असून नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मुळानदीवरील काही पुलं पाण्याखाली गेल्याने काही गावांचा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे. धरणातील येणार्या पाण्याच्या परिस्थितीनुसार विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अभियंता सायली पाटिल यांनी सांगीतले आहे.
तसेच टाकळी फाटा येथील कांदा मालाच्या गोडावूनमधील सर्व कांदा मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आज खरेदी-विक्री, लिलाव बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील गोकुळ नगरीं पूल वाहतूकीसाठी काही काळ बंद करण्यात आला होता. मात्र आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
कोपरगाव तालुक्यासह शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र दळवळण विस्कळीत झाले असून अनेक मार्गावर पाणी असल्याने सर्व शाळा, महाविद्यालये यांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
गोदावरी नदीच्या पाणी पातळीत बुधवारी रात्रीपासून वाढ झाल्यामुळे येथील काथ नाल्याच्या पुलावर अंदाजे चार फूटापेक्षा जास्त पाणी आल्यामुळे गुरुवारी पहाटेपासून पुणतांबा – कोपरगाव रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला आहे. तसेच पुणतांबा-शिर्डी रोडवरील पुलावरही तीन फूटापेक्षा जास्त पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
Web Title: Ahmednagar Heavy rain like cloud burst, creating a situation like horror