अहमदनगर: सामूहिक अत्याचार प्रकरणातील कैद्याचा तुरुंगात मृत्यू
Ahmednagar | अहमदनगर : जिल्ह्यातील २००१ मध्ये गाजलेल्या कोठेवाडी येथील महिलांवरील सामूहिक अत्याचार (Gang rape Case) प्रकरणातील कैदी हब्या पानमळ्या भोसले (वय ५५) याचा तुरुंगात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद येथील हरसूल कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सोमवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या गुन्ह्यातील १३ आरोपींना मोकोका अंतर्गत जन्मठेप आणि प्रत्येकी दहा लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे
कोठेवाडी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे १७ जानेवारी २००१ रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता संपूर्ण वस्तीवर १० ते १५ आरोपींनी दरोडा घालून जबर मारहाण करत चार महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता. तसेच ४४ हजार ३५ रुपयांचे दागिने लुटल्याची घटनेत होता. ही घटना चांगलीच गाजली होती.
अहमदनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली. नगरच्या सत्र न्यायालयाने आरोपींना जन्मठेप दिली. त्यानंतर आरोपींनी अन्य ठिकाणीही असेच गुन्हे केल्याचं आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार खटला दाखल करण्यात आला.
Web Title: Ahmednagar Gang rape Case Prisoner dies in prison