लग्न सोहळ्यातून दागिने पैसे चोरणारी टोळी जेरबंद
अहमदनगर | Ahmednagar: महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात लग्न सोहळ्यात येऊन दागिने व पैसे चोरणारी मध्यप्रदेश येथील गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पकडण्यात यश आले आहे.
मध्यप्रदेश येथील पिम्पलीया व देवास येथून ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या टोळीने १ डिसेंबर २०२० रोजी शिर्डी येथील लग्नसोहळ्यामधून दीड लाख रुपये चोरून नेण्यात आले होते. याबाबत अनिलकुमार उपाध्याय यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संदीप सुमेर सिसोदिया वय १९, गोलू सुमेर सिसोदिया वय २५, राधेश्याम उदयराम राजपूत वय ३०, बिपीन राजपाल सिंग वय २१ अनिल कमल सिसोदिया वय ३० गिरीराज दिनेशचंद शुक्ला वय २५ सर्व रा. देवास मध्यप्रदेश, विशालकुमार बनी सिंग वय १९ रा. रोशननगर हरियाना असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Web Title: Ahmednagar Gang arrested for stealing jewelry from wedding ceremony