Home अहमदनगर धक्कादायक जिल्ह्यात खळबळ: चार वर्षीय मुलीवर नराधमाने केला बलात्कार

धक्कादायक जिल्ह्यात खळबळ: चार वर्षीय मुलीवर नराधमाने केला बलात्कार

Ahmednagar Four-year-old girl rape by man

अहमदनगर | Ahmednagar Rape Case : एका तूर पिकाच्या शेतामध्ये चार वर्षाच्या लहान मुलीवर ३२ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यात ही घडली असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर तालुका पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहे.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या राहता तालुक्यातील जळगाव या गावांमध्ये राहणाऱ्या सिकंदर हुसेन शेख उर्फ काल्या(वय -३२ ) याने हा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. परिसरातील एका तूर पिकाच्या शेतामध्ये चार वर्षाच्या लहान मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी मुलीच्या आजीच्यातक्रारीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 402/ 2021 प्रमाणे बलात्कारासह ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास डीवायएसपी श्री.राहुल मदने, अतिरिक्त चार्ज श्रीरामपूर व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.मधुकर साळवे यांच्याकडुन कसुन शोध सुरू आहे.

Web Title: Ahmednagar Four-year-old girl rape by man

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here