Home अहमदनगर बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी वनकर्मचाऱ्याचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी वनकर्मचाऱ्याचा मृत्यू

Ahmednagar Forest worker injured in Bibatya attack dies

श्रीरामपूर l Ahmednagar:  श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती येथे मोहटा देवी मंदिर परिसरात रविवारी धुमाकूळ बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करणा-या जखमी वनकर्मचारी लक्ष्मण गणपत किनकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

लक्ष्मण गणपत किंनकर हे वनकर्मचारी म्हणून राहुरी वनपरिक्षेत्रात कार्यरत होते. मोरगेवस्ती येथे एका ठिकाणी दडलेल्या बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात बिबट्याने किनकर यांच्यावर हल्ला करून त्यांच्या मांडीला चावा घेतला होता. सहकर्मचाऱ्याच्या प्रयत्नामुळे त्यावेळी बिबट्याच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. त्यांच्यावर अहमदनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू होते.

परंतु बिबट्याच्या चाव्यामुळे झालेला संसर्ग किनकर यांच्या शरीरात पसरला आणि त्यामुळे त्यांचा आज बुधवार दिनांक 8 डिसेंबर रोजी पहाटे मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Ahmednagar Forest worker injured in Bibatya attack dies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here