Home अहमदनगर अहमदनगर: आधी विभाजन, नंतर नामांतर; राम शिंदे

अहमदनगर: आधी विभाजन, नंतर नामांतर; राम शिंदे

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा विभाजन आणि नामांतराचा सूर, पाठपुरावा सुरु- राम शिंदे.

Ahmednagar First partition, then renaming Ram Shinde

अहमदनगर: राज्यात अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा क्षेत्रफळाने सर्वांत मोठा आहे. त्यामुळे त्याचे विभाजन झाले पाहिजे. एक जिल्हाधिकारी, एक पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात सर्वदूर पोहचत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुविधा पोहचत नाहीत.

जिल्ह्याचे अहिल्यादेवी होळकर असे नामांतर करावे, अशी भूमिका भाजपचे आमदार राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. शिंदे यांनी सोमवारी (ता. ९) शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, (Ram Shinde) की पालकमंत्री असताना माझी हीच भूमिका होती. विभाजनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती, मात्र राज्यात इतर जिल्ह्यांच्या विभाजनाचा विषय आल्याने अहमदनगरच्या विभाजनाचा प्रश्न मागे पडला. आता जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव पाठविला होता. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

ज्या वेळी राज्यात जिल्हा विभाजनाचा निर्णय होईल, त्यात अहमदनगरला प्राधान्य राहील. जिल्हा विभाजनासाठी ८०० कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. विभाजनाबरोबर नामांतराचा प्रश्नही पुढे येत आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव द्यावे.

कारण, त्यांचे जन्मगाव या जिल्ह्यात आहे. त्यांचा अनेक दिवसांचा कार्यकाळ या जिल्ह्यात गेलेला आहे. त्यांनी सर्व समाजाच्या उद्धाराचे काम केले. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला. गावोगावी धर्मशाळा, नदीच्या काठावर घाट बांधले. त्यांनी सर्व समाजासाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव द्यावे, अशी सर्व समाजाची भावना आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil), खासदार सुजय विखे यांचा जिल्हा विभाजनाला विरोध आहे, असे विचारले असता, आमदार शिंदे म्हणाले, की राधाकृष्ण विखे विरोधी पक्षात होते त्यावेळी त्यांनी जिल्हा विभाजनाला पाठिंबा दिला होता. आता ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आता ते सत्तेत आहेत. विकासासाठी जिल्हा विभाजन ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. पक्षाकडून सूचना आल्यानंतर सर्वांचा एक सूर होईल. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, तसेच सर्व पक्षांची भूमिका यावेळी विचारत घेऊनच नामांतर प्रक्रिया केली जाणार आहे.

Web Title: Ahmednagar First partition, then renaming Ram Shinde

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here