जिल्हा रुग्णालय: वडिलांना वाचविण्यासाठी आगीत शिरलो पण
अहमदनगर | Ahmednagar Fire: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीयू करोना कक्षाला आज सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लागली आहे. या आगीत १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आग लागली असताना वडिलांना वाचविण्यासाठी आयसीयूमध्ये शिरलो पण तोपर्यंत उशीर झाला होता. नगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत वडील गमावलेल्या मुलाचा आक्रोश:
विवेक खाटिक यांच्या वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ते गेल्या १० दिवसांपासून उपचार घेत होते. कडूबाळ गंगाधर खाटिक वय ६५ असे या आगीत मृत्यू झालेल्या वडिलांचं नाव आहे. आग लागली त्यावेळी आई वडिलांसोबत होती मी बाहेर आलो होतो आग लागल्याचे समजताच मी रुग्णालयात धाव घेतली. मात्र वडिलांना वाचवू शकलो नाही असे विवेक यांनी सांगितले. आयसीयूला आग लागताच अगोदर आईला बाहेर काढले मी पळत पळत रुग्णालयात आलो. आगीची तीव्रता जास्त असल्याने आई मला आत जाऊ देत नव्हती. तरीही आत गेलो पण तोपर्यंत उशीर झाला होता असे विवेक यांनी सांगितले.
Web Title: Ahmednagar Fire I went into the fire to save my father