Home अहमदनगर स्वतः च्याच मुलाचे अपहरण करणारा पिता अटकेत

स्वतः च्याच मुलाचे अपहरण करणारा पिता अटकेत

Ahmednagar Father arrested for kidnapping child

अहमदनगर Ahmednagar: स्वतः च्या मुलाचे अपहरण करून गेल्या चार महिन्यापासून फरार असलेला आरोपी पिता यास नगर शहरातील तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. दादा आसाराम घोडके रा. पारोडी ता. आष्टी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्याकडून लहान मुलगा पृथ्वीराज दादा घोडके या मुलाची सुटका करण्यात आली आहे. आरोपी दादा घोडके याने त्याचा स्वतः चा लहान मुलगा पृथ्वीराज याचे चार महिन्यांपूर्वी अपहरण केले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात २९ ऑक्टोबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आरोपी घोडके हा फरार होता. तो सातत्याने आपले ठिकाण बदलत असे सदर ठिकाणी काढलेला फोटो तो दुसऱ्या दिवशी फेसबुकवर टाकून मोबाईल बदलण्याचा प्रकार करीत असून पोलीस यंत्रणेला आव्हान देण्याचे कार्य करीत होता.

मुलीच्या आईने न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने सर्च वारंट कडून बालकास सुखरूप न्यायालय समक्ष हजर करण्याचे आदेश पारित केले होते. आरोपीला पकडण्यासाठी पथकाची निवड करण्यात आली होती. या पथकाने अथक परिश्रमानंतर पृथ्वीराज यास सुखरूप ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले व आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Web Title: Ahmednagar Father arrested for kidnapping child

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here