Home अहमदनगर वाहनचालकाला डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटले

वाहनचालकाला डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटले

Ahmednagar driver was robbed with pepper spray in his eye

अहमदनगर | Ahmednagar: प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला नगरमध्ये प्रवाशांनीच लुटल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात पाच प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय खंडू हापसे वय ३२ रा. टाकळीमिया राहुरी हे प्रवासी वाहन चालवितात. सोमवारी सकाळी राहुरी येथून नगरकडे घेऊन प्रवाशांना त्यांच्या चार चाकी वाहनातून घेऊन निघाले. त्यांच्या वाहनात बसलेल्या पाच अनोळखी प्रवाशांनी राहुरी तालुक्यातील नांदगाव फाटा येथून त्यांच्या डोळ्यात तिखट टाकून गळ्याला टोकदार वस्तू लावून पाठीमागील सीटच्या मध्ये दाबून धरून पुणे मार्गाने पारनेर तालुक्यातील सुपा येथे घेऊन गेले. तेथे गळ्याला टोकदार वस्तू लावून त्यांच्याकडील एटीएम कार्ड हिसकावून घेत त्याचा पासवर्ड विचारला. तसेच चार चाकी वाहन असे मिळून ५ लाख रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले.

याप्रकरणी हापसे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहराचे पोलीस उपाधीक्षक ढुमे व पोलीस निरीक्षक माणगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.  

Web Title: Ahmednagar driver was robbed with pepper spray in his eye

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here