पत्नीला फोनवरच तलाक, पतीविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर | Ahmednagar: आपल्या पत्नीला फोनवरूनच तलाक म्हणून सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत असलेल्या पती विरोधात मुस्लीम विवाह कायद्यानुसार भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंदनगर येथे २० नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे.
याबाबत सदफ शेख वय ३१ रा. मुकुंदनगर यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार मी नोकरीनिमित्त दुबई येथे होते. मी १४ नोव्हेंबरला भारतात परत आले. घरी आल्यावर २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पती गुलाम दिन शहा वय ३२ हल्ली रा. मुंबई यांना फोन केला. त्यावर त्यांनी तू इंडिया आई है क्या, तू इंडिया किसलीये आई है, मेरा तेरे से और बेटी से कुछ रिश्ता नही, मुझे तेरे साथ संबध नही रखना है, मैने तुझे तलाख दिया है असे म्हणून फोन बंद केला. तसेच फोनवरच तलाख शब्द बोलून मुस्लीम महिला विवाह कायद्याचे उल्लंघन केले आहे.
या फिर्यादीवरून भिंगार पोलीस ठाण्यात पती गुलाम दिन शहा याच्याविरुद्ध मुस्लीम महिला विवाह कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar Divorce over wife over phone
कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436