अहमदनगर: महिलांना सोशियल मेडीयावर अश्लील मेसेज पाठविणारे ते दोघेजण गजाआड
Ahmednagar Crime | अहमदनगर: फेसबुकवर बनावट खाते बनवून सोशल मीडियावर महिलांना त्रास देणाऱ्या दोन आरोपींना अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. बनावट फेसबुक खाते आणि अनोळखी व्हाट्सअॅप नंबरवरुन हे दोन भामटे आरोपी महिलांना अश्लिल मेसेज पाठवणे (Pornographer), त्यांना मानसिक त्रास देणे असे दुष्कृत्य करत होते.
फेसबुकवर बनावट खाते तयार करून एका महिलेचा फोटो वापरून अश्लिल मेसेज करून महिला व तिच्या कुटुंबियांची बदनामी केली जात होती. या महिलने ता. 20 जानेवारी रोजी फिर्याद दाखल केली होती. दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी विनयभंग आणि माहिती- तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. आणखी एका महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अनोळखी व्हॉट्सअॅप नंबरवरून अश्लिल व्हिडीओ मेसेज करून फिर्यादी यांचा विनयभंग करून मानसिक त्रास देत आहे.
या गुन्ह्यांतील तांत्रिक विश्लेषण करून दोन्ही गुन्ह्यातील बनावट खाते तयार करून विनयभंग करून बदनामी करणारा आरोपी प्रमोद किसन पावसे आणि दीपू लक्ष्मणदास आहुजा (रा. गांधी रस्ता, उल्हासनगर) यांना जेरबंद करण्यात आले आहे.
पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलिस हवालदार राहुल हुसळे, योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलिस नाईक दिंगबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, यांचे पथकाने या गुन्ह्याचा तपास केला आहे.
Web Title: Ahmednagar Crime Pornographer arrested