अहमदनगर: महिला पोलिसाला बाजारपेठेत मारहाण
Breaking News | Ahmednagar Crime: वाहनचालकांना वाट करून देणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला भररस्त्यात शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना.
नगर : शहरातील कापड बाजारातील भिंगारवाला चौकात वाहतूक कोंडी झाली असता वाहनचालकांना वाट करून देणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला भररस्त्यात शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. हा संतापजनक प्रकार द्वारकासदास लस्सी दुकानासमोर घडला. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रकाश सखाराम घोलप (वय ५२, रा. नांगरे गल्ली, माळीवाडा) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने फिर्यादीत म्हटले आहे, की कर्तव्यावर असताना एका आरोपीच्या शोधार्थ गुरुवारी (दि. १८) सायंकाळी कापड बाजाराकडे चालल्या होत्या. त्या वेळी द्वारकादास लस्सी दुकानासमोर वाहतुकीची कोंड झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये वाहनचालकांना वाट करून देत असताना आरोपी घोलप वाहन पुढे घेण्यास सांगितले. त्याचा राग येऊन त्याने पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ सुरू केली. त्याला पोलिस असल्यास सांगूनही त्याने महिला पोलिस कर्मचाऱ्याला हात पकडून मारहाण करून शिवीगाळ केली.
याबाबत विनयभंग व सरकार कामात अडथळा आणल्याचा गुन्ह दाखल झाला आहे. रात्री साडेअकर वाजता पोलिसांनी आरोपीला अटक केली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक योगीता कोकाटे करीत आहेत.
Web Title: Ahmednagar Crime Police woman beaten up in market
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study