Ahmednagar Crime : आक्षेपार्हे व्हिडियो स्टेटसला ठेवल्याप्रकरणी एकास अटक
Ahmednagar Crime | अहमदनगर: लाल किल्ल्यावरील तिरंगा ध्वज हटवून पाकिस्तानसारखा ध्वज फडकविण्यासाठी एक तासाचे काम असा आशयाचा अक्षेपार्हे व्हिडियो स्टेटसला ठेवल्याप्रकरणी नगरच्या एका तरुणावर कोतवाली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय सन्मानाच्या अप्रतिष्ठा प्रतिबंद अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बजरंग दलाचे संयोजक कुणाल सुनील भंडारी यांनी फिर्याद दिली आहे,
अदनान आयाज सय्यद (वय 21 रा. कोतवाली पोलीस ठाण्याजवळ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ इंस्टाग्रामवर स्टेटस म्हणून ठेवल्याची माहिती 10 जून रोजी रात्री भंडारी यांना मिळाली होती. याबाबत कायदेशीर माहिती संकलित केली व सोमवारी कोतवाली पोलिसात धाव घेऊन हा प्रकार निदर्शनास आणला.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी तातडीने याची दखल घेतली. पोलिसांनी अदनान आयाज सय्यद याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
Web Title: Ahmednagar Crime One arrested for posting offensive video status