पत्रकार बाळ ज. बोठे याच्या विरोधात खंडणी व बदनामी केल्याचा गुन्हा
अहमदनगर | Ahmednagar: यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील मुख्य सूत्रधार पत्रकार यांच्या विरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद दाखल झाली आहे. बोठे याच्या विरोधात बदनामी व खंडणी मागितल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सोमवारी रात्री मंगल किसन हजारे यांनी फिर्याद दाखल केली आहे. सूत्रधार बोठे याने ११ ऑगस्ट २०१९ रोजी जिल्हा रुग्णालय प्रवेशद्वाराजवळ बोलावून १० लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच हजारे यांची वृत्तपत्रात बातमी देऊन बदनामी करण्यात आली असे फिर्यादीत म्हंटले आहे.
याप्रकरणी बोठेसह एका वैद्यकीय अधिकारी भागवत दहिफळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बोथे यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बोठे वर एका मागून एक गुन्हे दाखल होत असल्याने त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
Web Title: Crime of ransom and defamation against Baal Bothe