अहमदनगर ब्रेकिंग: प्रियकारकडून प्रेयसीच्या वडिलांवर खुनी हल्ला
अहमदनगर | Ahmednagar Crime: तरूणाबरोबर मुलीचे लग्न लावून देण्यास वडिलाने नकार दिल्याने राग मनात धरून त्या तरुणाने मुलीच्या वडिलांवर कोयत्याने खूनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
आकाश बाळू गायकवाड (वय 23 रा. सिव्हील हडको, अहमदनगर) असे हल्ला करणार्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आकाश गायकवाड विरूध्द खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने त्यांच्या मुलीचे लग्न आकाश गायकवाड याच्यासोबत लावून देण्यास नकार दिला होता. याचा राग आल्याने आकाश गुरूवारी दुपारी फिर्यादीच्या घरी गेला होता. शिवीगाळ करून फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार केला. त्यानंतरचा दुसरा वार फिर्यादीने चुकवण्याचा प्रयत्न केला असता आकाशने पुन्हा त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर कोयत्याने वार करत जखमी केले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर अधिक तपास करत आहेत.
Web Title: Ahmednagar Crime Murderous attack on the father of the beloved by the lover