अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच, वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: जिल्ह्यात कडक निर्बंध असूनही रुग्णवाढ ही सुरूच आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ३७८० रुग्ण वाढले आहे. वाढती रुग्णसंख्या ही जिल्ह्यासाठी चिंताजनक बनत चालली आहे. कोरोना स्थिती ही गंभीर बनत चालली आहे.
जिल्ह्यातील शासकीय प्रयोगशाळेत ९९९, खासगी प्रयोगशाळा चाचणीत ११०१ तर अॅटीजेन चाचणीत १६८० रुग्ण बाधित आढळून आले आहे.
नगर शहरात सर्वात जास्त रुग्ण तर नगर ग्रामीण, राहता. संगमनेर, नेवासा या तालुक्यांत अधिक रुग्णसंख्या वाढली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधितांची संख्या खालीलप्रमाणे:
मनपा: ९७०
नगर ग्रामीण: ३७६
राहता: ३०७
संगमनेर: २९७
नेवासा: २४६
पारनेर: १८५
राहुरी: १८३
श्रीरामपूर: १५८
श्रीगोंदा: १५५
कोपरगाव: १५१
शेवगाव: १३९
जामखेड: १३८
कर्जत: १३७
अकोले: ११५
पाथर्डी: १०८
भिंगार: ७९
इतर जिल्हा: २७
मिलिटरी हॉस्पिटल: ८
इतर राज्य: १
असे एकूण ३७८० बाधितांची वाढ झाली आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update Today 3780