अहमदनगर जिल्ह्यात आज इतके रुग्ण वाढले एकूण संख्या ४५ हजार ५०६
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या ४५ हजाराच्या पुढे गेली आहे. आज अखेर ४५ हजार ५०६ रुग्ण झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज सहा वाजेपर्यंत ४८१ रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या ३ हजार ६९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण मृत्यूची संख्या ७३२ वर पोहोचली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ४२, खासगी प्रयोगशाळा तपासणीत ७७ तर अॅटीजेन चाचणीत ३६२ असे एकूण ४८१ रुग्ण बाधित आढळले आहे,
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ४२ रुग्ण यामध्ये मनपा २२, अकोले १, जामखेड ४, नगर ग्रामीण ३, नेवासा १, पारनेर १, राहता १, श्रीगोंदा १, मिलिटरी हॉस्पिटल ८ असे बाधित रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळा तपासणीत ७७ यामध्ये मनपा ३०, कर्जत १, कोपरगाव २, नगर ग्रामीण ४, नेवासा २, पारनेर १, पाथर्डी ३, राहता २, राहुरी ९, संगमनेर १९, शेवगाव ३, श्रीरामपूर १ असे बाधित आढळून आले आहेत.
अॅटीजेन चाचणीत ३६२ रुग्ण यामध्ये मनपा १६, अकोले ४४, जामखेड ३०, कर्जत १७, कोपरगाव १८, नेवासा २७, पारनेर १२, पाथर्डी ३९, राहता ४९, राहुरी १५, संगमनेर २९, शेवागाव २७, श्रीगोंदा १७, श्रीरामपूर २२ असे बाधित आढळून आले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Corona update Today 3 oct 2020