अहमदनगर जिल्ह्यात आज २४३ रुग्ण तर ८३५ रुग्णांना डिस्चार्ज
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात काल सायंकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत २४३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ३७५१ झाली आहे.
यामध्ये मनपा ६६, संगमनेर ३६, राहता ३, पाथर्डी ९, नगर ग्रामीण २०, श्रीरामपूर ९, कॅन्टोनमेंट १६, नेवासा २६, अकोले १४, राहुरी १५, शेवगाव २४, कोपरगाव २५, जामखेड ६ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आज ८३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये मनपा २५२, संगमनेर ८२, राहता ५१, पाथर्डी ३६, नगर ग्रामीण ५१, श्रीरामपूर ५८, कॅन्टोनमेंट १३, नेवासा ४५, श्रीगोंदा ३६, पारनेर २४, अकोले ३५, राहुरी ४८, शेवगाव ६, कोपरगाव १७, जामखेड १७, जामखेड ३८, कर्जत ३३, मिलिटरी हॉस्पिटल ३, इतर जिल्हा ७ अशा रुग्णांचा समावेश आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २६९९१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८६.९५ टक्के इतका झाला आहे.
See: Latest Entertainment News and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Corona update today 14