अहमदनगर करोना ब्रेंकिंग: आज २६५ रुग्णांना डिस्चार्ज तर २०५ नवे पॉझिटिव्ह
अहमदनगर: जिल्ह्यात आज २६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४ हजार ६७१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०७ टक्के झाले आहे.
बरे झालेल्या रुग्णांत जामखेड १३, मनपा ६३, अकोले ६, कोपरगाव ९, कर्जत १७, नगर ग्रामीण ११, राहता १२, पाथर्डी ३, पारनेर १९, नेवासा ९, मिलिटरी हॉस्पिटल १, श्रीरामपूर ४, श्रीगोंदा ३१, शेवगाव १०, संगमनेर ४७, राहुरी ९, आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
सोमवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत २०५ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण १३६२ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १९, खासगी प्रयोगशाळेत ३१ तर अॅटीजेन चाचणीत १५५ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १९ यामध्ये श्रीगोंदा १, संगमनेर २, पारनेर १, नेवासा १, मनपा १३, असे बाधित आढळले आहेत.
खासगी प्रयोगशाळेत ३१ बाधित यामध्ये अकोले १, कर्जत २, मनपा ५, जामखेड १, नगर ग्रामीण ५, राहता १, पाथर्डी १, पारनेर २, राहुरी ७, संगमनेर ३, श्रीगोंदा १, श्रीरामपूर २ असे बाधित आढळून आले आहेत.
अॅटीजेन चाचणीत १५५ बाधित यामध्ये मनपा १०, जामखेड ६, अकोले १८, कर्जत २०, कोपरगाव २, नगर ग्रामीण २, नेवासा ७, पाथर्डी १५, पारनेर ६, राहुरी १, राहता २, संगमनेर १५, शेवगाव ११, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर २२, कॅन्टोनमेंट २ असे बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ५६ हजार ९०६ तर ८७३ मृत्यू झाले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar Corona Report Update Today 3 Nov