अहमदनगर जिल्ह्यात आज इतके रुग्ण वाढले ७१९ रुग्णांना डिस्चार्ज
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील आज ७१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २६ हजार १५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८६.६७ टक्के इतका झाला आहे.
आज ७१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला यामध्ये मनपा ३०९, संगमनेर ६, राहता ३२, पाथर्डी १३, नगर ग्रामीण ५७, श्रीरामपूर २४, कॅन्टोनमेंट ७, नेवासा ६, श्रीगोंदा २२, पारनेर ३४, अकोले ४, राहुरी ३३, शेवगाव ७३, कोपरगाव ४३, जामखेड २१, कर्जत २४, मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान काल सायंकाळी ६ वाजे पासून ते आज बारा वाजेपर्यंत १६३ रुग्ण वाढले आहे. त्यामुळे सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ३५५४ इतकी आहे.
यामध्ये मनपा २३, संगमनेर १, राहता २, पाथर्डी ५, नगर ग्रामीण २९, श्रीरामपूर १, कॅन्टोनमेंट २, नेवासा २०, श्रीगोंदा ११, पारनेर १४, शेवगाव २४, कोपरगाव २५, जामखेड ६ अशा रुग्णांचा समावेश आहे. एकूण करोनाबाधितांची संख्या ३०,१७८ झाली आहे.
See: Latest Entertainment News and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Corona Report Today 13 Sep