Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात करोना रुग्णांनी ५० हजाराचा टप्पा ओलांडला

अहमदनगर जिल्ह्यात करोना रुग्णांनी ५० हजाराचा टप्पा ओलांडला

Ahmednagar Corona Patient reached 50 thousand

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील आत्तापर्यंत एकूण करोनाबाधितांचा आकडा हा ५० हजाराच्या पलीकडे गेला आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज शनिवारी सहा वाजेपर्यंत ५४५ रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

सध्या जिल्ह्यात ४०५४ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण करोनाबाधितांची संख्या ५० हजार २२३ इतकी झाली आहे. एकूण मृत्यू संख्या ७८७ इतकी झाली आहे.  जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १२७, खासगी प्रयोगशाळेत १६९, अॅटीजेन चाचणीत २४९ असे आज एकूण ५४५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

 जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १२७ यामध्ये मनपा ५८, अकोले १९, जामखेड ३, कोपरगाव १, नगर ग्रामीण १०, पारनेर ४, पाथर्डी २, राहुरी १, शेवगाव ८, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर १, मिलीटरी हॉस्पिटल ५, कॅन्टोनमेंट २, असे बाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेत १६९ रुग्ण यामध्ये मनपा ५१, अकोले ७, कोपरगाव २, नगर ग्रामीण १७, नेवासा १३, पारनेर ५, पाथर्डी ५, राहुरी ९, राहता २३, श्रीगोंदा १, संगमनेर २९, श्रीरामपूर ७ असे बाधित आढळून आले आहेत.

अॅटीजेन चाचणीत २४९ रुग्ण यामध्ये जामखेड २०, कर्जत २०, अकोले १९, मनपा १३, नगर ग्रामीण १, कोपरगाव ७, नेवासा १७, पारनेर ५, पाथर्डी ४५, राहता १९, संगमनेर ४७, श्रीगोंदा १०, शेवगाव ११, कॅन्टोनमेंट २, श्रीरामपूर १३ असे बाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Corona Patient reached 50 thousand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here