अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी काढला नवीन आदेश, जाणून घ्या काय राहणार सुरु काय बंद
अहमदनगर: अत्यावाश्यक सेवा आणि प्रवर्गातील बाबींकरिता नागरिक मोठ्या प्रमाणावर अनावश्यकरित्या घराबाहेर पडत असल्याची बाब निदर्शनास आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेकामी अत्यावश्यक सेवा आणि सूट असलेले प्रवर्गातील काही बाबींवर निर्बंध लावण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिनांक १८ एप्रिल २०२१ ते १ मे २०२१ पर्यंत नवे निर्बंध जरी केले आहेत. हा आदेश जिल्ह्यातील सर्व हद्दीतील नागरिकांसाठी लागू राहील. यामध्ये कोणत्या सेवा सुरु राहणार व बंद आदेशाद्वारे जारी केले आहे.
जिल्ह्यात बंद असलेल्या बाबी:
- हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना पिक अप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिवरी चालू राहील.
- धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.
- आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.
- भाजीपाला व फळे बंद राहतील द्वार वितरणास परवानगी आहे.
- दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील.
- रिक्षा फक्त अत्यवश्यक सेवांकरिता सुरु राहतील.
- चार चाकी खासगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवेकरिता वाहतुकीस चालू राहतील.
- दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवाकरिता सुरु राहतील.
- सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.
- कटिंग, सलून, पार्लर पूर्णतः बंद राहतील.
- शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग बंद राहतील.
- स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद
- विवाह समारंभास बंदी राहील.
- चहा टपरी दुकाने बंद राहतील.
- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील.
- सिनेमा हॉल, नाट्य गृह, समारंभ पूर्णतः बंद राहतील.
- सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा विषयक पूर्ण बंद राहतील.
- सर्व प्रकारची खाजगी बांधकामे बंद राहतील.
- आधार केंद्रे, ई सेवा केंद्र बंद राहतील.
- व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, मोर्निंग वाक पूर्णतः बंद राहतील.
- बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.
वेळेच्या निर्बंधासह सुरु असलेले आस्थापना खालीलप्रमाणे:
- किराणा दुकाने वेळ सकाळी ७ ते ११
- दुग्ध व दुग्धपदार्थ विक्री वेक सकाळी १ ते ११
- भाजीपाला विक्री , फळे विक्री फक्त द्वार वितरण वेळ सकाळी ७ ते ११
- अंडी मटन चिकन विक्री वेळ सकाळी १ ते ११
- कृषी बाबत सर्व दुकाने वेळ सकळी ७ ते ११
- पशु खाद्य विक्री वेळ सकाळी ७ ते ११
- पेट्रोल पंपावर खाजगी वाहनाकरीता पेट्रोल, डीझेल सकाळी १ ते ११
- पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक व अत्यावश्यक सेवा पेट्रोल व डीझेल विक्री नियमित वेळेनुसार असेल.
कोणतीही व्यक्ती अथवा संस्था यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास तरतुदीनुसार फौजदारी गुन्ह्यास पात्र राहील.
Web Title: Ahmednagar Collector issues new order