Home अहमदनगर अहमदनगर: मातीच्या ढिगार्‍याखाली दबून बालकाचा जागीच मृत्यू

अहमदनगर: मातीच्या ढिगार्‍याखाली दबून बालकाचा जागीच मृत्यू

Ahmedmnagar News:  मातीच्या ढिगार्‍याखाली दबून एका बालकाचा जागीच मृत्यू (Died) झाला तर एकजण गंभीर जखमी.

Ahmednagar child died on the spot after being buried under the mud pile

कर्जत:  मातीच्या ढिगार्‍याखाली दबून एका बालकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील सुपा फाटा येथे आज गुरुवारी दुपारी घडली. नितीन दीपक यादव (वय 8) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. हेमंत दीपक यादव (वय 6) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ही दोघे भावंडे मातीच्या ढिगार्‍यामध्ये जागा करून खेळत होती. दरम्यान वरुन मातीचा ढीग कोसळल्याने दोन्ही मुले मातीखाली दबली गेली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मदतीसाठी धावले. मात्र त्यावेळी बराच उशीर झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही मुले ही मजुरी करण्यासाठी आलेल्या कुटुंबासोबत राहत होती. मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून दोघांना कर्जत येथे नेण्यात आले. जखमीवर कर्जतच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

Web Title: Ahmednagar child died on the spot after being buried under the mud pile

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here