सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून सोने लुटले
अहमदनगर: केडगाव परिसरात चार दरोडेखोरांनी रात्री घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करून पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने लुटण्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. नगर जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ सुरु आहे. निर्मळ पिंपरी, विसापूर फाटा आणि आता नगर शहराजवळील केड गाव येथे सशस्र दरोडा टाकला आहे. यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रमाकांत महादेव पराळे यांनी याबाबत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास दरोडेखोर रमाकांत महादेव पराळे यांच्या घरात घुसून त्यांच्या मेहुन्यास बंदुकीचा धाक दाखविला तसेच दमदाटी केली. दुसऱ्या एका दरोडेखोराने रमाकांत पराळे यांच्या डोक्यात बंद्कीच्या मागील बाजूने डोक्यात घाव घातले, पोटात मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चैन काढून घेतली. तसेच आणखी एका दरोडेखोराने पाठीला चाकू लावून मारहाण केली.
See Also:Rusev Debuts In AEW Amid Tensions
या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी घटना भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणाच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे.
Web Title: Ahmednagar Armed robbery looting of gold at gunpoint