अहमदनगर: शेतकऱ्यांच्या वेशात पोलिसांनी लावला सापळा… सहा गावठी कट्टे जप्त, सराईत गुन्हेगाराला पकडले
Ahmednagar Crime News: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरमध्ये सहा गावठी कट्टे जप्त (seize ) केल्याची कारवाई.
अहमदनगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरमध्ये सहा गावठी कट्टे जप्त केल्याची कारवाई केली आहे. या प्रकरणी भैय्या शेख या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 1 लाख 56 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेवासा येथे विक्री करण्याचे उद्देशाने सहा गावठी कट्टे आणि 12 जिवंत काडतुस अवैधरित्या बाळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.
हे गावठी कट्टे कुठून आणले याचा तपास पोलीस करत आहे. या आठवड्यात गावठी कट्टे पकडण्याचा अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुकाणे गावात सापळा लावला होता.
यावेळी काही पोलिसांनी शेतकऱ्यांच्या वेषात शेतात काही वेळ कामही केले. त्यानंतर संशयित आरोपी टप्प्यात येताच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. गावठी कट्ट्यासह पकडण्यात आलेल्या भैय्या शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हयाची नोंद असून तो अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते.
Web Title: Ahmednagar Action taken by the local crime branch team to seize six village katas
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App