Home अहमदनगर Ahmednagar: अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी आरोपीस सक्तमजुरी

Ahmednagar: अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी आरोपीस सक्तमजुरी

Ahmednagar Accused of molesting minor girl

अहमदनगर | Ahmednagar: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपी लक्ष्मीकांत नारायण ढगे (वय 41 रा. गुलमोहर रोड, नगर) यास जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. व्ही. देशपांडे यांनी दोषी ठरवून ४ वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.  याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता,

ही घटना 15 एप्रिल 2017 रोजी घडली होती. नगर शहरातील एक अल्पवयीन मुलगी पेपर सुटल्यानंतर घरी येत असताना लक्ष्मीकांत ढगे याने मुलीजवळ येत, चौथीचे क्लास कुठे आहे, अशी चौकशी करत तिचा हात पकडून गैरवर्तन केले होते. त्यावेळी फिर्यादी यांचा दूधवाला व काही ओळखीच्या इसमांनी सदरचा प्रकार पाहिला होता. त्यांनी फिर्यादीला माहिती दिली. फिर्यादीने ढगे याला याविषयी विचारले असता, ढगे याने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली होती. त्यानंतर फिर्यादी, पीडित मुलगी व इतर काही इसम चाईल्ड लाईनच्या कार्यालयात गेले.

तेथे उपस्थित असलेल्या साथीदाराने त्याच्या अल्पवयीन मुलीसोबत ढगे याने गैरवर्तन केल्याचे सांगितले. यानंतर ढगे विरोधात विनयभंग, पोक्सो कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक के. दी. शिरदावडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले.

Web Title: Ahmednagar Accused of molesting minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here