Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्ण बरे तर इतके वाढले

अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्ण बरे तर इतके वाढले

Ahmednagar 758 patient discharge today

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ७५८ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४१ हजार ७५ झाली आहे.

आज ७५८ रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये मनपा १७०, अकोले ३३, नेवासा ४९, पारनेर ३३, पाथर्डी ४१, राहता ४४, राहुरी २४, संगमनेर ६३, शेवगाव ४०, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ४८, कॅन्टोनमेंट ३, जामखेड २९, कर्जत २२, कोपरगाव ३९, नगर ग्रामीण ८०, मिलिटरी हॉस्पिटल ११, इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते आज १२ वाजेपर्यंत १४ रुग्णांची भर पडली आहे. सध्या ३ हजार २३७ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण करोनाबाधितांची संख्या ४५ हजार ३९ इतकी झाली आहे.

आज १४ प्राप्त अहवालात मनपा ७, जामखेड ४, नगर ग्रामीण १, राहता १, श्रीगोंदा १ असे बाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar 758 patient discharge today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here