Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज ७४५ रुग्ण बरे होऊन घरी

अहमदनगर जिल्ह्यात आज ७४५ रुग्ण बरे होऊन घरी

Ahmednagar 745 patient dischargeअहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ७४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४४ हजार ८५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.७२ टक्के इतके झाले आहे.

डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांत मनपा १३६, अकोले ३२, जामखेड ६३, कर्जत ४७, कोपरगाव १९, नगर ग्रामीण ४७, नेवासा ४४,  पारनेर ३५, पाथर्डी ४३, राहता ४९, राहुरी ३९, संगमनेर ७०, शेवगाव ४४, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर ४१, मिलिटरी हॉस्पिटल ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

एकूण करोनाबाधितांची संख्या ४९ हजार १६७ तर ७५९ मृत्यू झाले आहेत. ३ हजार ८०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्याचा बरे होण्याचे प्रमाण हे वाढले आहे. मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी झाली असून बरे होण्याचे प्रमाण देखील ९० टक्केपेक्षा अधिक आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar 745 patient discharge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here