Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात ५१८ रुग्णांना डिस्चार्ज तर ७८ ने वाढ
अहमदनगर: जिल्ह्यात आज ५१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३६,६७५ झाली आहे. बरे होण्याचे प्रमाण ८८.४१ टक्के इतके झाले आहे.
यामध्ये मनपा १०१, अकोले ३, जामखेड ४४, कर्जत २१, कोपरगाव ३७, नगर ग्रामीण ४५, नेवासा ४४, पारनेर ३५, पाथर्डी ६, राहता २८, राहुरी ३४, संगमनेर ४२, शेवगाव ३, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ६२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
तसेच जिल्ह्यात आज बारा वाजेपर्यंत ७८ रुग्णांची भर पडली आहे. सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ४१२७ इतकी झाली आहे. ७८ बाधित यामध्ये मनपा ३८, कर्जत १, नगर ग्रामीण ७, पाथर्डी ३, राहुरी २, संगमनेर १, श्रीगोंदा ११, मिलिटरी हॉस्पिटल ११, श्रीरामपूर १ असे बाधित आढळून आले आहेत.मृत्यूची संख्या ६८२ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात एकूण करोनाबाधित आकडा ४१ हजार ४८४ वर पोहोचला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar 518 patient discharge Today