Ahmednagar: जिल्ह्यात ४७३ रुग्णांना डिस्चार्ज तर इतके वाढले रुग्ण
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३८,८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे परमान ८९,५० टक्के इतके झाले आहेत.
आज ४७३ रुग्णांना घरी सोडण्यात आले यामध्ये मनपा १०२, अकोले ५२, जामखेड ३५, कर्जत १९, कोपरगाव २३, नगर ग्रामीण २९, नेवासा २४, पारनेर १२, राहता ५०, राहुरी १२, संगमनेर २७, शेवगाव २२, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १६, कॅन्टोनमेंट ५, मिलिटरी हॉस्पिटल १२ असे रुग्ण बरे झाले आहेत.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज १२ वाजेपर्यंत ४७ रुग्ण जिल्ह्यात वाढले आहे. त्यामुळे उपचार सुरु असलेली रुग्णसंख्या ३ हजार ८४९ इतकी झाली आहे.
यामध्ये मनपा २०. अकोले १२, नगर ग्रामीण १, नेवासा ४, पारनेर २, पाथर्डी १, शेवगाव २, श्रीगोंदा २, श्रीरामपूर २, मिलिटरी हॉस्पिटल १ असे बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ४६ हजार ३९६ तर मृत्यू संख्या ७०९ इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar 473 patient discharge