Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ३३२ रुग्णांना डिस्चार्ज
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्केवर पोहोचले आहे. ही एक जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब ठरत आहे.
जिल्ह्यातील आज ३३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते बरे होऊन घरी परतले आहे. सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या १४५६ इतकी झाली आहे.
आज बरे झालेले रुग्ण यामध्ये मनपा ७४, जामखेड १४, कोपरगाव १४, अकोले १२, कर्जत १५, नगर ग्रामीण ५, पारनेर १७, नेवासा १६, मिलिटरी हॉस्पिटल १, श्रीरामपूर १४, श्रीगोंदा १०, शेवगाव २३, संगमनेर ३८, राहुरी ८, राहता २०, पाथर्डी ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ५१ हजार २५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सद्यस्थितीत १४५६ रुग्ण उपचार घेत असून ८१३ रुग्ण मृत्यूमुखी झाले आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५३ हजार ५१९ इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar 332 patient Discharge Today