Home अहिल्यानगर Ahmednagar: जिल्ह्यात ३० हजार करोनाबाधितांचा आकडा पार

Ahmednagar: जिल्ह्यात ३० हजार करोनाबाधितांचा आकडा पार

Ahmednagar 30 thousand corona infected

अहमदनगर | Ahmednagar: संपूर्ण राज्यभर करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यातही हे संकट कायम आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्येने ३० हजाराचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३० हजार ९५ इतकी झाली आहे. मात्र सध्या ४११६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात काल सायंकाळी सहा वाजेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५०१ रुग्णांची भर पडली आहे. आज प्राप्त जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १०९, खासगी प्रयोगशाळेत १८४ तर अॅटीजेन चाचणीत २०८ रुग्ण बाधित आढळून आले आहे.  

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १०९ बाधित यामध्ये मनपा ४०, संगमनेर १०, नगर ग्रामीण ३. श्रीरामपूर १, कॅन्टोनमेंट ५, नेवासा १, पारनेर १, अकोले २१, राहुरी १९, शेवगाव ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत १८४ बाधित यामध्ये मनपा ३९, संगमनेर १२, राहता १८, पाथर्डी ३, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर ३१, कॅन्टोनमेंट २, नेवासा ९, श्रीगोंदा १, पारनेर ६, अकोले ८, राहुरी २४, कोपरगाव ४, जामखेड ८, कर्जत ९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अॅटीजेन चाचणीत २०८ रुग्ण यामध्ये मनपा ३३, संगमनेर १०, राहता ४२, पाथर्डी १७, श्रीरामपूर ५, श्रीगोंदा २०, पारनेर ९, अकोले २८, राहुरी २, शेवगाव १, कोपरगाव ७, जामखेड १३, कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २५४३७ इतकी आहे तर ४६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

See: Latest Entertainment News and Latest Marathi News

Web Title: Ahmednagar 30 thousand corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here