Home अकोले अकोले तालुक्यात सहा करोनाबाधित तर जिल्ह्यात इतके रुग्ण झाले बरे

अकोले तालुक्यात सहा करोनाबाधित तर जिल्ह्यात इतके रुग्ण झाले बरे

Ahmednagar 290 discharge Akole taluka 6 corona infected

अकोले| Ahmednagar: अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात सहा जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची करोनाबाधितांची संख्या २१८६ इतकी झाली आहे.

आज प्राप्त अहवालात ब्राम्हणवाडा येथील ३५ वर्षीय पुरुष तर २५ वर्षीय तरुणी बाधित आढळून आली आहे. समशेरपूर नागवाडी येथे ३० वर्षीय महिला, कोतूळ येथे २३ वर्षीय तरुण, बाजारपेठ अकोले ३५ वर्षीय पुरुष, कोतूळ ब्राम्हणवाडा रोड २५ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात आज २९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ५२ हजार ९४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४ टक्के झाले आहे. सध्या जिल्ह्यात १३४० रुग्ण उपचार घेत आहेत.

आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा ४६, अकोले २१, कर्जत १३, जामखेड १०, कोपरगाव १०, नगर ग्रामीण २७, पारनेर १७, नेवासा ५, पाथर्डी ३७, राहता १७, राहुरी ११, संगमनेर १९, शेवगाव ७, श्रीगोंदा १० श्रीरामपूर १७, कॅन्टोनमेंट ७, मिलिटरी हॉस्पिटल १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar 290 discharge Akole taluka 6 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here