अल्पवयीन मुलीवर 7 वर्षे अत्याचार करणाऱ्या बापाला 20 वर्षे सक्तमजुरी
अहमदनगर| Ahmedagar: अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Abuse of a Minor Girl) करणार्या बापाला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अहमदनगर एका उपनगरातील हा आरोपी आहे. जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे हा निकाल दिला. याप्रकरणी सरकारी वकील म्हणुन अॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले.
फिर्यादी अल्पवयीन मुलगी बापासह तिच्या लहान भावासोबत राहत होती. तिची आई त्यांच्यासोबत राहत नव्हती. त्यामुळे पिडीत मुलगी ही घरातील सर्व घरगुती काम करून शालेय शिक्षण घेत होती. तिचे आजी-आजोबा हे त्यांच्या घराशेजारीच राहत होते. फिर्याद देण्याच्या सात वर्ष आगोदरपासुन तिचा बाप तिच्यावर शारिरीक अत्याचार करत होता. त्यावरून पिडीत मुलीची आई व बापामध्ये वाद झाले होते. त्यामुळे पिडीत मुलीची आई ही पिडीत मुलीला घेवुन औरंगाबाद येथे निघुन गेली होती. तेव्हा तिच्या बापाने त्यांचा शोध घेवुन पिडीत मुलगी व भावास घरी अहमदनगर येथील घरी आणले होते. त्यानंतर आरोपी हा पिडीत मुलीवर नैसर्गिक तसेच अनैसर्गिक शारिरीक अत्याचार करत असे. 20 मार्च 2019 रोजी तिच्या बापाने पिडीत मुलीवर अनैसर्गिक, शारिरीक अत्याचार केला.
पिडीत मुलीला त्रास झाल्याने तिने सर्व माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अनैसर्गिक अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक आर. आर. पांढरे यांनी करून न्यायालयात आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने 07 साक्षीदार तपासण्यात आले.
Web Title: Ahmednagar 20 years hard labor for a father who abused a minor girl