संगमनेर: आश्वी पंचक्रोशीत १७ मेंढ्या तर दोन शेळ्यांचा मृत्यू
संगमनेर | Ahmednagar: दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसात भिजून गारठली यामध्ये १७ मेंढ्या व २ शेळ्या मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी तालुक्यातील गावांमध्ये घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
संततधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन थंडी वाढली आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेतकरी, जनावरे, पशु पक्षांना बसला आहे. पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील बाळू चिंधू तांबे हे मेंढ्या चारण्यासाठी शिबलापूर परिसरात वास्तव्यास आहेत. बुधवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने तांबे यांच्या पाच मेंढ्या दगावल्या असून त्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शिबालापूर येथील अलीम सलीम शेख यांची शेळी देखील गारव्याने दगावली आहे. त्यांचे आठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच दाढ खुर्द येथे मेंढ्या चरण्यासाठी आलेल्या चंद्रकांत हरिभाऊ कोळपे यांच्या ३ मेंढ्या व शेळीचे बकरू दगावल्याने त्यांचे ४५ हजारांचे नुकसान झाले आहे. पिंप्री येथे बाळासाहेब लहानू दातीर यांच्या ६ मेंढ्या व खळी येथे वाघू हिरू पोकळे यांच्या ३ मेंढ्या मृत्यू झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Web Title: Ahmednagar 17 sheep and two goats die in Ashwi